Friday, December 5, 2008

शिळी झालीएत आता चितेवरची फुलं...
श्रदधांजली आणि भिंतींवरचे फोटो...
शिळी नाही ना होउ शकत अशी अंत:करणातली धसधस...
रात्र झालीए आता...
आणि युगभरात गोठलेलं रक्त आग लावुन जाळायचय...
पण जंगलात वणवाही नकोय...
पोळतील हात..
आणि उरेल फ़क्त राख...
एक दिवा हवाय उब देण्यासाठी...
एक ज्योत हविए अंधार फ़ोडण्यासाठी....