Friday, December 5, 2008

चांदण्यांच्या तेजा पेक्षा रस्त्यावरचे दिवे प्रखर होताएत...
आणि हे अनुभवणारा भावनांचा थांबा सुन्न...

डोळे फ़ाडुन बघाव लागणारं सॊंदर्य खिदळतंय...
आणि हळ्हळतीए बंद पापण्यांमागची सोनेरी किनार...

रखरखत्या उन्हात वारयाची मंद झुळूक नाही...
घोंघावतीए बोचणारी खोलीपुरती हवा...

पापड लाटण्याचे दिवसही आता सुकून पापड झाले...
कारण आजीच्या लाट्याही आता दुकानात मिळ्तात म्हणे...

No comments: