Saturday, May 2, 2009

आज माझे डोळे जरा वेगळेच दिसताएत...

आरसा तर तोच आहे कदाचीत...

सोनेरी किनारीचा उभट गोल...

आरसा आणि ओळखीचा तसा काही संबंध नव्हेच म्हणा...

गुणधर्मच असतो आरश्याचा तो...

जवळ येताना साफ़ होत जाणारं चित्र...

पण अंतर अगदीच संपलं तर विस्कंटून जातं मात्र...

डोळ्यावर वारंवार पाणी मारलं हो...

पण पटंतच नाहिए ओळख...

काजळ लावायचं राहुन गेला असेल कदाचीत...

पण आठवणींच्या ज्योतीलगत निरंतर जळणारी काजळी होतीच की...

असो.... होतं म्हणे असं कधी कधी...

होतही असेल...

आकाशातले पक्षी नाही.. पण पायाखालंची जमिन बघुनंही

चालावं लागतच बरयाचदा...

चालायचंय...

ओळखीचं काय आहे... पटेल कधीतरी...

डोळे मिटल्यावर बहुदा...

2 comments:

Sangram said...

तुला कमेंट टाकायला आलो आणि थोडेफार मिही लिहिले ... http://rohitbhosale.blogspot.com/2009/05/blog-post.html

छान लिहिलेयस ... आणि स्फुर्तीबद्दल धन्यवाद

Deep said...

ह्म्म्म सही लिहिलयस :)