Wednesday, January 25, 2012

अधून मधून पण अगदी नियमित पणे असे दिवस उजडतात, ज्यात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि आपल्यामध्ये एक अदृश्य, त्रासदायक अंतर जन्म घेत. खुपदा कॉम्पुटर्स, वर्चुअल गप्पा, बिलं आणि रोज उगवणाऱ्या नवीन नवीन इच्छांच्या गदारोळात हा बदल आपली निब्बरता छेदु  शकत नाई... पण थोडं थांबलं, टेकेडी वर शांत बसला कि त्या अंतराची भयाणता जाणवायला लागते.. मेजर गोंधळ तेव्हा होतो ना जेव्हा हि गोष्ट अगदी गुरुत्वाकर्षणा सारखी matter of factly घेतात सगळे... पण नकोय मला असा! Detachment चा काहीतरी messed up अर्थ लावतोय ना आपण सगळे? शेवेटी हे सगळा का? छान नोकऱ्या, visiting cards वरती मस्त वाटणार्या पदव्या, कपाटामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा दाखला देणारी पुस्तकं, Parties मध्ये उगाच telecom ministry नि कसा घोळ घातलाय यावर चर्र्वीचारण या सगळ्या मध्ये मी दुसर्या व्यक्तीशी खरी खरी कधी बोलू , मी होऊन? (in progress)

No comments: